सध्या सोशल मीडियावर एका वयोवृद्ध आजोबांचा डान्स चा
निसर्गाच्या सानिध्यात आजोबांनी धरला ठेका; व्हिडीओ एकदा बघाच...
शिरुर: सध्या सोशल मीडियावर एका वयोवृद्ध आजोबांचा डान्स चांगलाच धुमाकूळ घालत आहे. डोंगराच्या कुशीतून खळखळ वाहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धबधब्यासमोर एका आजोबांनी अक्षरशः तरुणाईलाही लाजवेल असा भन्नाट डान्स केला आहे. लपकझपक स्टेप्स, आत्मविश्वास आणि निसर्गाच्या तालावर थिरकणारी ही अदाकारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. वय हा केवळ एक आकडा आहे, असे आजोबांनी त्यांच्या हटके स्टाईलने दाखवून दिलं आहे. हे आजोबा कुठले आहेत हे अद्याप समोर आलं नसलं तरी आजोबांच्या दिलखुलास खेचक अदाकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समाज माध्यमांमध्ये एका आजोबांनी केलेल्या डान्सची सध्या चर्चा सुरु आहे. निसर्गाच्या सानिध्यात आजोबांनी ठेका धरला आहे. मात्र आजोबा कोण आहेत? कुठले आहेत? हे अद्याप समजलेले नाही.