Lalbaugcha Raja : 'लालबागचा राजा'च्या विसर्जनासाठी गुजरातचा खास तराफा सज्ज! काय आहे 'या' तराफ्याचे वैशिष्ट्य? जाणून घ्या
मुंबई: 27 ऑगस्ट रोजी देशभरात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. तसेच, 6 सप्टेंबर रोजी अंनत चतुर्दशी असल्याने, सर्व गणेशभक्त त्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे विर्सजन करणार आहेत. अंनत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मोठी तयारी करण्यात आली आहे. या काळात, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'लालबागचा राजा' गणपतीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन केले जाईल. यासाठी विशेष तयारी देखील करण्यात आली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि विशेषत: गणेश विसर्जनासाठी लालबाग- परळ, गिरगाव आणि दक्षिण मुंबईतील मुख्य रस्त्यांवर भाविकांची गर्दी असते. त्यामुळे, सुरक्षा कारणात्सव लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 'फेस डिटेक्टर' ही यंत्रणा अंमलात आणली आहे. तसेच, इतर गणेशोत्सव मंडळांमध्ये मेटल डिटेक्टर आणि इतर यंत्रणा बसवण्यात आले आहेत.
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास तयारी
यंदा, लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास मोटराइज्ड तराफा आणण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा मोटराइज्ड तराफा गुजरातमधून आणण्यात आला आहे. या मोटराइज्ड तराफ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, हा तराफा 360 अंशात फिरतो. तसेच, विसर्जन करताना स्प्रिंकलर्समधून पाण्याचे फवारे उडवले जातील. यामुळे, गणेशभक्तांना अविस्मरणीय अनुभव पाहायला मिळणार आहे. या मोटराइज्ड तराफ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यावर्षी या तराफ्याला दुसऱ्या बोटीची मदत लागणार नाही.
असा असेल 'लालबागचा राजा'च्या विसर्जनाचा मार्ग
सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात प्रवास सुरू होईल.
त्यानंतर, दुपारी 1 ते 2 दरम्यान, चिंचपोकळी रेल्वे पुलावर लालबागचा राजाचे आगमन होईल.
दुपारी 3 ते सायंकाळी 5 दरम्यान लालबागचा राजा भायखळा स्टेशनजवळ येणार.
त्यानंतर, सायंकाळी 7 ते रात्री 9 च्या दरम्यान, लालबागचा राजा नागपाडा चौकात पोहोचेल. यादरम्यान, ढोल-ताशांच्या गजरात भाविक लालबागचा राजाचे स्वागत करतील.
रात्री 10 ते मध्यरात्री 12 च्या दरम्यान लालबागचा राजा गोल देवल याठिकाणी पोहोचेल.
तसेच, पहाटे 2 ते 4 यादरम्यान, लालबागचा राजा ओपेरा हाऊस ब्रिज इथे असेल. याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी उपस्थित असतात.
7 सप्टेंबर रोजी सकाळी 5 ते 7 दरम्यान, लालबागचा राजाचे विसर्जन गिरगाव चौपाटीला होणार. यादरम्यान, भाविक लाखोंच्या संख्येने लालबागचा राजाला निरोप देतात.