महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक पडसाद

अंजली दमानियांनी दिला शरद पवारांना सल्ला

महाराष्ट्र: महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक पडसाद उमटतांना पाहायला मिळताय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया ह्या आक्रमक होतांना पाहायला मिळताय. या संतोष देशमुख हत्ये प्रकरणी अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिलीय. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम आज बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. इतकंच नाही, तर शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. 

हेही वाचा: शिंदे पकडणार होते काँग्रेसचा हात; बड्या नेत्याने केला दावा काय बोलल्या अंजली दमानिया?  शरद पवारांनी आधीच जर नेत्यांना त्यांच्या चूका दाखवल्या असत्या आणि तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं. धनंजय मुंडेंचे आधीच कान का पकडले नाही? हे संगळ थांबवलं गेलं पाहिजे, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. 

शरद पवार मागे म्हणाले होते की, धनंजय मुंडेंना आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं, काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या. का तुम्ही त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या होत्या? धनंजय मुंडे यांना तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं. बीड मधील जितके आमदार आहेत, एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे त्यांच्या पक्षातले होते. शरद पवार यांनी त्यांना काय केलं, त्यांनी काय शिकवलं, असा सवाल दमानिया यांनी शरद पवारांना केला आहे.

दरम्यान सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम आज बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. इतकंच नाही, तर शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.