Bank of Maharashtra Loan Interest Rate: बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्याजदरांमध्ये कपात
नवी दिल्ली: बँकेतून कर्ज घेणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आणि मोठी बातमी समोर आलीय. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने आपल्या गृह कर्ज (Home Loan), वाहन कर्ज (Car Loan) आणि इतर किरकोळ कर्जांच्या व्याजदरांमध्ये 0.25% कपात केलीय. त्यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त झाले आहे. ही कपात भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून रेपो दरात 0.25% घट केल्यानंतर करण्यात आलीय.
RBI च्या निर्णयामुळे दिलासा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 7 फेब्रुवारी रोजी 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच रेपो दरात 0.25% कपात केली, त्यामुळे तो आता 6.25% झाला आहे. याचा थेट फायदा बँकेच्या ग्राहकांना मिळत आहे.
व्याजदरांमध्ये किती बदल? गृह कर्जाचा (Home Loan) नवीन व्याजदर 8.10% झाला आहे, जो बँकिंग क्षेत्रातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे. तसेच, वाहन कर्ज (Car Loan) आता 8.45% दराने मिळेल. शिक्षण कर्ज (Education Loan) आणि इतर कर्जांच्या व्याजदरातही 0.25% घट करण्यात आली आहे.
हेही वाचा: पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना दिल्या कोणत्या सूचना? प्रोसेसिंग फी देखील माफ बँक ऑफ महाराष्ट्रने गृह आणि वाहन कर्जावर प्रोसेसिंग फी (Loan Processing Fees and Charges) हटवली आहे, त्यामुळे कर्ज घेणे आणखी स्वस्त झाले आहे. यामुळे ग्राहकांना कर्ज घेण्यात अधिक सोयीस्कर वाटेल. तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात आणखी काही बँका कर्जदर कमी करू शकतात.
कर्जासाठी अर्ज कसा करावा? जर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून गृह किंवा वाहन कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता:
बँकेच्या अधिकृत वेबसाइटला (bankofmaharashtra.in) भेट द्या गृह/कार कर्ज विभागात जा. तुमची आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. बँक तुमचा अर्ज पुनरावलोकन करून कर्ज मंजूर करेल.