पुण्यातील बॅनर ठरताय चर्चेचा विषय
पुणे: सद्या महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापल्याच पाहायला मिळतंय. शिवसेना विरुद्ध ठाकरे गट यांच्यात वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात गाण्याच्या माध्यमातून एकमेकांवर टीकास्त्र सोडलं जातंय. कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं गायल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामरा याने गायलेलं गाणं पुन्हा गायल्याने याचे राजकीय पडसाद उमटू लागले.
हेही वाचा: अर्थसंकल्पात लावलेला 'तो' कर मागे यातच आता आणखी भर म्हणजे पुण्यात आता या गाण्यावरून बॅनर झळकू लागलेत. पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठाकरे गटाने हे बॅनर लावले असून यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महारष्ट्रात बंदी आहे का? अशा आशयाचे ह्या बँनरचे स्वरूप असून हे बॅनर चर्चेचा विषय ठरताय.
दरम्यान पुण्यातील ह्या बँनरमुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कामराच्या या कारणामामुळे शिवसैनिकांनी कामराने माफी मागावी अशी मागणी केली होती. यावर कामराने एक्स पोस्ट करत माफी मागण्यास नकार दिला आणि आणि मी जे काही बोललो तेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटले असल्याचे सांगितले.
कुणाल कामरा याने केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतापले आणि त्यांनी कामराच्या शोचे चित्रीकरण झालेल्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच यावर राजकीय नेतेमंडळींनीही आरोप- प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. या गाण्यात बेकायदेशीर काय ? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळकेंनी केला आहे. त्यांनीही कुणाल कामराचं गाणं गायलं आहे. त्यांनतर आता हे बॅनर झळकू लागल्याने राजकारण आणखीनच तापले आहे.