Baramati News: बारामती एमआयडीसी विमानतळाजवळ रेडबर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाचा अपघात
Baramati News: बारामती एमआयडीसी येथील विमानतळा जवळ असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन या खाजगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या शिकाऊ विमानाला आज सकाळी आठच्या सुमारास अपघात झाला आहे.. प्रशिक्षणार्थी पायलट विवेक यादव विमान उडवत असताना पुढील टायर मध्ये तांत्रिक बिघाड झाला टायर वाकडे होऊन निखळल्याने विमान टॅक्सीवरून बाजूच्या गवतात घुसले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु विमानाच्या पंख्याचे आणि चाका जवळील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हेही वाचा: Baramati News: इंदापूर क्रीडा संकुल निधीवर राजकीय बॅनर संघर्ष; राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाढती स्पर्धा अपघात कसा घडला?
विवेक यादव यांनी नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतले होते लँडिंग दरम्यान पुढील टायर मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येतात त्यांनी आपत्कालीन लँडिंग चा प्रयत्न केला मात्र टायर निखळल्याने विमान धावपट्टी सोडून गवतात गेले घटनास्थळी रेडबर्ड च्या कर्मचाऱ्यांनी तातडीने विमान बाजूला घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले रेडबल कडून याप्रकरणी कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
मात्र रेडबर्ड एव्हिएशनच्या विमानांना यापूर्वीही बारामतीत अपघात झाले आहेत ऑक्टोबर 2023 मध्ये चार दिवसाच्या अंतराने दोन अपघात घडले होते त्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन रेडवरच्या सर्व तळावरील प्रशिक्षण कार्यवाहीवर निर्बंध घातले होते यामध्ये तांत्रिक बिघाड आणि देखभाल प्रक्रियेतील त्रुटी आढळल्या होत्या.. काही महिन्यापूर्वी हे निर्बंध उठल्यानंतर प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले परंतु आजच्या घटनेने पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
झालेला अपघात हा विमानतळाजवळ घडल्याने मोठी दुर्घटना पडली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे जर विमान एखाद्या निवासी भागात शाळेत किंवा एमआयडीसी मधील कंपनीवर कोसळले असते तर यामध्ये मोठी हानी होऊ शकली असती.