रविवारी अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर

प्रवीण गायकवाड हल्ला प्रकारणावर अंधारे आक्रमक; बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर: रविवारी अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासले. यावेळी अत्यंत आक्रमक झालेल्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले होते. या हल्ल्यानंतर सुषमा अंधारे यांनी रविवारी भाजप तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले बावनकुळे?

नागपूर येतील पत्रकारांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, तो आरोपी आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना माहित असायला पाहिजे, ते  कार्यकर्ते, हे मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढतात. पोलिसांनी योग्य कारवाई करायला पाहिजे'. 

हेही वाचा: कामाच्या तणावातही 'या' राशीला मिळणार यशाचा नवा मार्ग

सुषमा अंधारेंची खोचक टीका

'प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय..! #WorstPolitics', ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर तसेच भाजपवर एक्सच्या माध्यमातून खोचक टीका केली.