आरक्षणाच्या सुरू असलेला संघर्ष एकाच्या जीवावर बेतल

Beed: मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी, मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेत उचललं टोकाचं पाऊल

बीड: राज्यात आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चर्चेत आहे. आरक्षणाच्या सुरू असलेला संघर्ष एकाच्या जीवावर बेतला आहे. बीड तालुक्यातील आहेर धानोरा येथील संतोष अर्जुन वळे यांनी आरक्षण मिळत नसल्याची खदखद व्यक्त करत अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली. तब्बल चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. संतोषचे वय 39 वर्षे होतं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनात संतोष वळे सहभागी होते. संतोष वळे हे शेतकरी कुटुंबातील होते. तसेच त्यांना मुलांच्या भवितव्याची विशेष काळजी होती. त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण सुरु असताना वारंवार आपल्याला आरक्षण मिळत नाही, त्यामुळे पुढचा काळ फार कठीण आहे, अशी खंत ते व्यक्त करत असत होते. आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे आणि भविष्याबद्दलच्या चिंतेमुळे ते कायमच निराश राहायचे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

हेही वाचा: Sanjay Raut: टीम इंडियाला पाकिस्तानसोबतची मॅच खेळायची नाहीये, पण क्रिकेटपटूंवर जय शाहांचा..., संजय राऊतांचा गौप्यस्फोट वळे यांंनी विष प्राशन करुन संपवलं जीवन 2 सप्टेंबर रोजी त्यांनी त्यांच्या घरी विष प्राशन केलं. त्यामुळे तातडीने त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी त्यांनी शेवचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी पल्लवी, दोन लहान मुलं, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. 

वळे यांंच्या आत्महत्येमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखीच तापला आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला; मात्र शेवटी त्यांना नैराश्यात टोकाचे पाऊस उचलले. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक लोकांकडून शासनाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

'कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये' मनोज जरांगे पाटील कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन वारंवार करत आहेत. त्यानंतरही आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलले जात आहे. एका बाजूला मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी तीव्र होत आहे, दुसरीकडे ओबीसी आपले हक्क वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.