Ayush Komkar Murder Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणीबाबत मोठी अपडेट! आंदेकर टोळीतील चौघांना गुजरातमधून अटक
Ayush Komkar Murder Case: नानापेठमध्ये झालेल्या गँगवॉरमधील आयुष उर्फ गोविंदा कोमकर हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी आणखी एक धडक कारवाई केली आहे. तपासाचा विस्तार करत पोलिसांनी गुजरात गाठले आणि तिथून आंदेकर कुटुंबातील चार जणांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांची नावे शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर अशी आहेत.
या प्रकरणी याआधीच 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडूअण्णा राणोजी आंदेकर (64), तुषार वाडेकर (24), स्वराज वाडेकर (21), वृंदावनी वाडेकर (40), अमन युसूफ पठाण उर्फ खान (22), सुजल मेरगू (23), अमित पाटोळे (19) आणि यश पाटील (19) यांचा समावेश आहे. तपासानुसार अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुषवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती.
हेही वाचा - Bomb Threat at Taj Palace: दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षेत वाढ
काय आहे नेमकं प्रकरण?
आंदेकर आणि कोमकर या दोन कुटुंबांमधील राडा वर्षभरापासून सुरू आहे. 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नवराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा, 19 वर्षीय आयुष कोमकर याला लक्ष्य केले.
हेही वाचा - AI Solved Crime Case : सख्खा मित्र बनला पक्का वैरी! पण का? AI ने शोधला आरोपी; स्टील कॅपने उलगडलं भयानक रहस्य
हत्येची थरारक घटना
दरम्यान, 5 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये आयुष हा लहान भाऊ अर्णवला क्लासमधून घेऊन आला होता. गाडी पार्क करत असताना अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर थेट 12 राऊंड फायरिंग केले. त्यातील 9 गोळ्या लागल्याने आयुष घटनास्थळीच कोसळला. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी 12 आरोपींना अटक केली आहे.