महाराष्ट्र

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी मोठी अपडेट समोर

 

पुणे रेव्ह पार्टीप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे प्रांजल खेवलकरांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. प्रांजल खेवलकरांसह त्यांच्या चार साथीदारांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना तीन दिवस अधिकची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयासमोर केली होती. पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या. आरोपींनी वेगवेगळ्या महिलांशी चॅट केलेले पाहायला मिळाले. एका महिलेचा व्हिडीओ एका व्यक्तीला पाठवला होता. त्यावर आक्षेपार्ह कमेंट केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आता प्रांजल खेवलकरांचा मोबाईल आणि लॅपटॉपची चौकशी करायची असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.