छत्रपती संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर आली आ

Sambhajinagar Crime: प्रेमात धोका, वादातून टोकाचं पाऊल; प्रियकराने प्रेयसीला खोल घाटात ढकललं

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून दोघांमध्ये वाद झाल्याने प्रियकराने त्याच्या प्रेयसीला धक्का देऊन दौलताबादच्या घाटात ढकललं. या घटनेत संबंधित तरूणीचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर, आरोपी तरूण स्वत: शिउर पोलिस ठाण्यात हजर झाला आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा: Haldi Ceremony: लग्नापूर्वी वधू-वरांना हळद का लावली जाते? जाणून घ्या

नेमकं प्रकरण काय?

सुनील खंडागळे नावाचा प्रियकर दिपाली आसवारसोबत फिरायला गेला होता. या दरम्यान, अचानक प्रेम प्रकरणातून दोघांमध्ये वाद झाला. मात्र, काही वेळातच, हा वाद आणखी पेटला. या घटनेनंतर, रागाच्या भरात आरोपी सुनील खंडागळे याने दिपाली आसवारला दौलताबाद येथील घाटात धक्का दिला. त्यामुळे, दिपाली क्षणातच खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर, आरोपी सुनील खंडागळे स्वत: शिउर पोलिस ठाण्यात हजर झाला आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच, आरोपी सुनीलने पोलिसांना घटनास्थळी घेऊन आला. तेव्हा, शिउर पोलीसांनी पीडित दिपालीचा मृतदेह काढला. यामुळे, पोलिसांनी आरोपी सुनील खंडागळेला अटक केले असून पोलिस पुढील तपास करत आहेत. तसेच, ही घटना दौलताबाद याठिकाणी घडल्यामुळे आरोपी सुनील खंडागळेविरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.