Buldhana Crime: बुलढाणा सरपंचावर लोखंडी रॉडने हल्ला
बुलढाणा: महाराष्ट्रात पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. बुलढाणा येथील सुटाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे. डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने सरपंच निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथील सरपंच निलेश देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आला आहे. निलेश देशमुख यांच्या डोक्यात लोखंडी रोड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये थुंकण्यावरून हा वाद झाला असल्याचं सांगितलं जात आहे. या शुल्लक कारणामुळे सरपंच निलेश देशमुख यांच्यावर हा जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पोलिसांची भीती उरली नाही का असा संतप्त सवाल उपस्थित केला जातो.
हेही वाचा : दमानियांनी केलेल्या आरोपांवर धसांचे स्पष्टीकरण बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरण ताजे असतानाच बुलढाण्यात सरपंचावर हल्ला झाल्याने राज्यातील सरपंच सुरक्षित नाहीत तर तेथील सामान्य नागरिक सुरक्षित असतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.