लातूर-नांदेड महामार्गावर बसला भीषण अपघात
लातूर : लातूर-नांदेड महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे. दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस पलटली आहे. अपघातातील जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.
नांदेड महामार्गावर आष्टामोड नजीक असलेल्या नांदगाव पाटी येथे ती महामंडळाची बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 30 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाले असून पाच ते सहा प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे माहिती समोर येत आहेत. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयामध्ये अपघातातील प्रवाशांना दाखल करण्यात येत असून युद्ध पातळीवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : स्वारगेट अत्याचार प्रकरणात नवी माहिती समोर
दुचाकीला वाचवण्याच्या नादात बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये एकूण 48 प्रवाशी होते. त्यापैकी 30 ते 40 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर लगेच पोलिसांनी घटास्थळी धाव घेतली आहे. तसेच तेथील नागरिकही प्रवाशांच्या मदतीसाठी आले. लातूर जिल्ह्यातील नांदगाव पाटीजवळ हा अपघात झाला.
नांदेडहून लातूरकडे येणारी बस नांदगाव पाटीजवळ पलटल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या रस्त्यावर मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात बस पलटी झाली. अपघातामधील जखमींना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, अपघाताबाबत नातेवाईकांना व कुटुबीयांना फोनवरुन माहिती देण्यात आली आहे.