तलाव परिसरात कबुतरांना खाद्य देण्यास मनाई असल्याचे

Mumbai: न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन! वांद्रे तलावाजवळ कबुतरांना खायला घालणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pigeon Feeding Ban: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल वांद्रे पोलिसांनी कबुतरांना खायला घालणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (18 सप्टेंबर) सकाळी करण्यात आली. नालासोपारा येथील मेहताब शेख (27), वांद्रे येथील निखिल सरोज (21) आणि सलाम कुमार (22) या तिघांसह दुचाकीवरून घटनास्थळावर आलेल्या एका महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या महिलेनं पोलिसांना पाहताच मोटारसायकलवरून वेगाने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - Ladki Bahin E-KYC: ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींना अडचण; ओटीपी मिळत नसल्याने लाभार्थी महिलांना मनस्ताप

बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान तलावाजवळ कबुतरांना दाणे घातल्याचे तिन्ही तरुणांकडून उघड झाले. तलाव परिसरात कबुतरांना खाद्य देण्यास मनाई असल्याचे सूचना फलक असूनही त्यांनी नियम मोडला. या कारवाईनंतर तिन्ही आरोपींना नोटीस बजावून सोडण्यात आले.

हेही वाचा - Farah Khan : दिलीपच्या पगाराबाबत फराहने केला गमतीदार खुलासा; म्हणाली, 'दिलीपचा पगार दरमहा...'

दरम्यान, पळून गेलेल्या महिलेने वापरलेल्या दुचाकीबाबत माहिती घेण्यासाठी आरटीओकडे चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या मते, चौघांनी त्यांना थांबवणाऱ्या नागरी अधिकाऱ्यांशी वादही घातला. हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) कलम 270, 271, 223 आणि 221 अंतर्गत नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.