पुण्यात राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दोन मु

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; राज्य महिला आयोगाकडून घटनेची दखल

मुंबई : पुण्यात राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दोन मुलींवर बलात्कार केल्याची घटना घडली. शंतनू कुकडे नावाच्या पदाधिकाऱ्याने गरजू मुलींचे शोषण केल्याची धक्कादायक माहिती माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी बाहेर काढली आहे. या संदर्भात त्यांनी महिला आयोगाला पत्र दिल्याचे देखील सांगितले. दरम्यान या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली आहे. आरोपीवर कठोर कारवाई होणार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाकडून घटनेची दखल घेण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आरोपीवर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. या घटनेसंदर्भात त्यांनी एक पोस्ट केली आहे. 

हेही वाचा : माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केला खळबळजनक खुलासा

रुपाली चाकणकरांची पोस्ट पुण्याच्या समर्थ पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात पॉक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगिक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजू मुलींचे शोषण तसेच आर्थिक गैरव्यवहार याची पोलीस चौकशी करत आहेत. तसेच धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी, वेश्याव्यवसाय आरोप याबाबत ही तपासात सत्यता समोर येईल.राज्य महिला आयोगाने पुणे पोलीसांना या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करत सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.अल्पवयीन मुलीची सुरक्षितता तसेच समुपदेशन यासाठी ही प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे. 

कोण आहे शंतनू कुकडे? शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी आहे. कुकडे याच्याकडे राष्ट्रवादी पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्षपद आहे. शंतनु कुकडे याचा पुणे कॅम्प परिसरात आलिशान बंगला आहे. या बंगल्यात तो गरजू विद्यार्थांसाठी राहण्याची सोय करतो. काही महिन्यांपूर्वी बंगल्यात दोन मुली राहण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी एक अल्पवयीन होती. या दोन मुलींनी शंतनु कुकडेने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर कुकडेवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.