शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक मार्गात बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये आणि गर्दीचे नियोजन नीट व्हावे, यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त (ट्रॅफिक) अमोल झेंडे यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. या नियोजनानुसार, 19 फेब्रुवारी रोजी शहरातील काही प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग
शिवजयंतीनिमित्त बुधवारी (19 फेब्रुवारी 2025) सकाळी 6 वाजल्यापासून शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. या बदलामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
शिवाजी रोड: जीजामाता चौक ते स्वारगेट जाणारा मार्ग SG बारवे चौक, जंगली महाराज रोड, खांडोजीबाबा चौक आणि टिळक रोडमार्गे वळवला जाणार. लक्ष्मी रोड: लक्ष्मी रोडवर मिरवणुकीदरम्यान वाहतूक सांत कबीर चौक आणि समर्थ विभागमार्गे वळवली जाणार. बाजीराव रोड: पुरम चौक ते शिवाजीनगर जाणारी वाहतूक पुरम चौक, टिळक रोड, अलका टॉकीज चौक आणि फर्ग्युसन कॉलेज रोडमार्गे वळवली जाणार. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक: हा मार्ग केळकर रोडमार्गे वळवला जाणार.
पार्किंगची व्यवस्था वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून वाहनचालकांसाठी काही ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे: संगमवाडी पार्किंग FC ग्राउंड पार्किंग नदीपात्र पार्किंग अॅग्री कॉलेज ग्राउंड
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रेमुळे वाहतूक बदल
या विशेष पदयात्रेचा मार्ग: COEP ग्राउंड → SG बारवे चौक → ASPMS कॉलेज शिवाजी पुतळा → SG बारवे चौक → मॉडर्न चौक → झांसी राणी चौक → खांडोजी बाबा चौक → गुडलक चौक → FC ग्राउंड. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत FC रोड आणि JM रोडवरील वाहतूक बदलण्यात येणार आहे.
आपत्कालीन सेवा सुटणार
सर्व वाहतूक बदल हे सर्वसामान्य वाहतुकीसाठी असले तरी रुग्णवाहिका, पोलीस आणि अन्य आपत्कालीन सेवांच्या वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे. पुणेकरांनी या बदलांबाबत जागरूक राहावे, ट्रॅफिक पोलिसांच्या सूचना पाळाव्यात आणि आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा.