Chhagan Bhujbal : 'आंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांचा हात'; छगन भुजबळांचा गंभीर आरोप
मुंबई: सध्या शरद पवार गटावर गंभीर आरोप होत आहेत. 'आंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या अनुयायांचा सहभाग होता', असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे. मंत्री छगन भुजबळांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'काही वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये ही काही दगडफेक झाली होती, जो काही हिंसाचार बळावलेला होता, यामागे शरद पवारांचा हात आहे', असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं. या घटनेनंतर, चर्चेला उधाण आलेला आहे.
नेमकं प्रकरण काय?
29 ऑगस्टपासून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. जेव्हा, मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू केले, तेव्हा एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंशी फोनवर चर्चाही केली होती. मात्र, मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिले. यादरम्यान, 1 सप्टेंबर रोजी मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, त्यामुळे पोलिसांनी मनोज जरांगेंना उपचारासाठी आंदोलनस्थळी आले होते.
यादरम्यान, दुपारी 3:30 वाजल्याच्या सुमारास 300 ते 350 पोलिसांचा फौजफाटा आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाला होता. त्यानंतर, दुपारी 4:30 वाजल्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक राहूल खाडेंसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही.
काही वेळानंतर, पोलीस पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी निघाले होते. तेव्हा, ज्याठिकाणी आंदोलन सुरू होते, तिथे पोलिसांनी 1 ते दीड हजार जमावाला घेराव घातला होता. तसेच, सायंकाळी 4:30 ते 4:45 वाजल्याच्या सुमारास नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये हाणामारी सुरू झाली, तेव्हा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केले होते. या घटनेदरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तसेच, प्लास्टिक बुलेट आणि अश्रुधुराचाही वापर केला होता. या घटनेत तब्बल 30 ते 40 नागरिक जखमी झाले होते.