Chhatrapati Sambhajinagar: पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांनी पाईप, लाकडी फळी टाकून काढला मार्ग
विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगीपासून जवळच असलेल्या सय्यदपुर येथे शनिवारी रात्रीच्या जोरदार पावसामुळे नळकांडी पुल वाहून गेला. हा पुला नेहमीच्याच पुरामध्ये वाहून जात असून गुत्तेदार व संबंधीतही याकडे जाणून-बुजून लक्ष देत नाहीत. त्यामुळे गावकर्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शनिवारी तात्पुर्ता तयार करण्यात आलेल्या पुलाचे काही सिमेंटी पाईप वाहून गेले. त्यामुळे पुन्हा सय्यदपुर गावाचा संपर्क तुटला होता. मात्र गावकर्यांनी एकत्रित येवून साध्या पध्दतीने पीयुसी पाईप टाकून व त्यावर लाकडी फळ्या टाकून जाण्या-येण्यासाठी मार्ग केला. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे प्रशासनातील अधिकारी फिरकले नाहीत.
आपत्तकालीन परिस्थिती प्रशासनाचे ग्रामसेवक, तलाठ्याने गावात हजर राहणे गरजेचे आहे. मात्र येथील आगळ्या-वेगळ्या राजकारणामुळे अधिकारी वर्गही गावाकडे लक्ष देत नसल्याने त्याचे वाईट परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीत ग्रामसेवक व तलाठी हे गावात डुकूनही बघत नाहीत. इतकी गंभीर अवस्था या गावाची झालेली आहे. अनेकवेळा या ठिकाणी तात्पुरर्त्या स्वरुपाचा तयार करण्यात आलेला पूल थोड्या पावसाच्या पाण्यात वाहून जातो. त्यामुळे गावाच्या दळण-वळणाचा प्रश्न गंभीर होत असतो. मात्र गावकर्यांनी अनेकवेळा ओरड करुनही प्रशासनापर्यंत त्यांचा आवाज जात नसल्याने न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न गावकर्यांपुढे निर्माण झाला आहे.
पुल अनेकवेळा वाहून गेला दुधना नदीपात्र मोठे असल्याने सध्या सय्यदपुर गावाच्या वरच्या बाजूला मोठा पुल तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र गुत्तेदाराने पावसाळा लागण्याअगोदरपासून गांभीर्याने न घेतल्याने पुलाचे काम अर्धवट तयार होऊन पडले आहे. त्यामुळे या पुलाचा वापर करता येत नाही. त्यासाठी गावाच्या खालील बाजुला सिमेंट पाइप टाकून व मुरुम टाकून पूल करण्यात आला आहे. मात्र हा पूल थोड्या पुराच्या पाण्यात वाहून जात आहे. त्यामुळे गावकर्यांना वारंवार लाडसावंगी गावाशी संपर्क तुटतो. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे,अशी मागणी होत आहे.
गामसेवक-तलाठ्याला देणं-घेणे नाही आपत्कालीन परिस्थितीत गावातील ग्रामसेवक-तलाठी यांना सय्यदपूर गावाचे काहीही सोयरसूतक नाही, हे दोघे प्रशासनाचे प्रतिनिधी गावात एकदाही हजर नसतात. त्यामुळे गावकरी मेटाकुटीला आला आहे, या दोन जबाबदार व्यक्तींवर सक्तीची कारवाही करावी अशी मागणी होत आहे.