Chhatrapati Sambhajinagar: चिंताजनक! जिल्ह्यात साथीच्या रोगांचं थैमान; दररोज रुग्णांच्या संख्येत होतेयं झपाट्यानं वाढ
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. दररोज आठ हजार रुग्णांना सर्दी, खोकला आणि ताप होत आहे. वातावरणाच्या बदलाच्या परिणामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
दररोज आठ हजार रुग्णांना सर्दी, खोकल्याचा 'ताप' छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वातावरणातील बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, सर्दी, खोकल्यासह व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. घराघरांमध्ये खोकल्याचे 'खो खो' सुरू आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकल्याचा 'ताप' सहन करणारे रोज सुमारे 8 हजार रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. यामुळे तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप, छातीत घरघर आवाज येणे, धाप लागणे, सतत खोकला व पिवळसर किंवा हिरवट कफ, श्वास घेण्यास त्रास, ऑक्सिजनची पातळी कमी होणे, अशक्तपणा, जेवणाची इच्छा न होणे, डोळे खोल जाणे या गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगितले आहे.
हेही वाचा: Today's Horoscope: आज अडचणीचा सामना करावा लागेल, 'या' राशींनी काळजीपूर्वक पाऊले उचला
संभाजीनगरातील वातावरणात बदल झाला आहे. या बदलामुळे नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज आठ हजार रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. सर्दी, ताप, खोकला, अशक्तपणा, कफ, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास यांसारख्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. हवामान बदलाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संभाजीनगरातील नागरिक चिंतेत आहेत. तर नागरिकांच्या आजारपणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.