छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक ध
Chhatrapati Sambhajinagar: महिलेची हात जोडून विनंती; सोनोग्राफीचा डॉक्टर मात्र गाढ झोपेत
विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला वारंवार त्रास होत असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी पीडित महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली. मात्र, तेव्हा नर्स म्हणाली की, 'डॉक्टर झोपले आहे. मी तुम्हाला काही गोळ्या देते. संध्याकाळी जेव्हा डॉक्टर उठतील तेव्हा आपण सोनोग्राफी करू'.
हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड नंबर 5 स्त्री रोग तज्ञ विभागात घडला. सोनोग्राफी करण्यासाठी तब्बल एक तास झाले पीडित महिला स्त्री रोग विभागाच्या बाहेर उभी होती. मात्र, तरीही डॉक्टरांची झोप अजून झाली नाही. त्यामुळे, लाखो रुपये पगार असणाऱ्या या डॉक्टरांकडून गोरगरीब जनतेची अजून किती हेळसांंड होणार, असा प्रश्न रुग्णांना पडला आहे.