समृद्धी महामार्गाच्या आमणे-इगतपुरी टप्प्याचं आज मु

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 'समृद्धी'च्या आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण

मुंबई : समृद्धी महामार्गाच्या आमणे-इगतपुरी टप्प्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 76 किमीचा टप्पा आजपासून सुरु होणार आहे. आता राज्याची राजधानी ते उपराजधानी हा थेट प्रवास सुरु होणार आहे. आज आमने ते इगतपुरी ह्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. 

हेही वाचा : शाळांमध्ये हिंदी शिकवण्याच्या सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण समृद्धी महामार्गाचा इगतपुरी-आमणे हा 76 किमीचा शेवटचा टप्पा आहे. 35 मीटर रूंद आणि 6 लेन असलेला दुहेरी बोगदा असा हा मार्ग आहे. आता मुंबईकरांना फक्त 8 तासांत नागपूर गाठता येणार आहे. तर नाशिक येथून मुंबई फक्त अडीच तासांत गाठणं शक्य होणार आहे. समृद्धी महामार्ग हा 6 लेनचा,120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांबीची महामार्ग आहे. ताशी 150 किमी गतीने प्रवासासाठी महामार्गाचं डिझाईन करण्यात आलं आहे. महामार्गावर 65 उड्डाणपूल, 24 इंटरचेंज आहेत. तर कसारा घाटातून जाताना 6 बोगदे आहेत. अनेक वाहनं तसेच पादचारी अंडरपास आहे. इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ 8 किमी लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आलाय. अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फूल वॉटर मिस्ट सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे.