छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरी करण्याची अजब घटना घडली

बुरखा घालून चोरी करणाऱ्यांना चोप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरी करण्याची अजब घटना घडली आहे. बुरखा घालून चोरी करणाऱ्यांना जमावाने चोप दिला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

बुरखा घालून चोरीसाठी घरात शिरणाऱ्या दोघांना जमावाने चोप दिल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सईदा कॉलनीमध्ये घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीत एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात बुरखा परिधान करून दोन चोरटे चोरीच्या उद्देशाने शिरले होते. घरात चोरटे शिरल्याचे घरातील महिलेच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केली. त्यामुळे बुरखाधारी दोघे दुचाकीवरून सुसाट वेगाने पळून जात असताना जमावाने दोघांना पाडून बेदम मारहाण केली. मुले चोरणारी टोळी असल्याची अफवा पसरल्याने जमावाने दोघांना बेदम चोप दिला. दरम्यान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करत दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : पालकमंत्रिपदावरुन शिवसेना - राष्ट्रवादीत वाढला दुरावा  

बुरखा चोरांना जमावाने घेतले ताब्यात  संभाजीनगरात काही दिवसांपासून मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली होती. अशातच छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीत एक घटना घडली आहे.  बुरखा घालून दोन चोर चोरीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात शिरले. बुरखा परिधान करत चोरीच्या उद्देशाने  चोरटे घरात शिरल्याचे घरातील महिलेच्या लक्षात आले. त्यावेळी महिलेने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर बुरखा चोरांनी दुचाकीवरून धूम ठोकली. त्याचवेळी जमावाने दोघांना बेदम मारहाण केली. याच दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी जमावाला शांत करत दोन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोन चोरांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.