नाताळनिमित्त वसई विरार परिसरातील चर्च आणि घरे सजली
नाताळनिमित्त वसईतील चर्च आणि परिसर सजली
पालघर : नाताळनिमित्त वसई विरार परिसरातील चर्च आणि घरे सजली आहेत. रंगबिरंगी लाइटिंग व स्टार, ख्रिसमस ट्री लावून सजावट करून सजवलेले पहायला मिळत आहेत. नाताळनिमित्त मिनी गोवा म्हणून ओळखला जाणाऱ्या वसई तालुक्यात नाताळची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
वसईच्या पश्चिम पट्ट्यामधील ख्रिस्ती बांधवांमध्ये आपल्या घरांना व परिसरांना सजवण्याकरिता उत्सुकता दिसत आहे. ख्रिस्ती बांधव काही तासांवर येऊन ठेपलेल्या नाताळ सणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या परिसरातील विरार पूर्वेच्या नंदाखाल चर्चलासुद्धा सजवण्याचं काम सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा : 'बीडच्या पालकमंत्री पदाबाबत एकत्रित निर्णय घेऊ'