मुख्यमंत्री फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर; तुळजाभवानी माता आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेणार
राज्यातील राजकीय घडामोडींनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यापासून दूर राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्ब्ल 21 महिन्यांनंतर आज आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते तुळजाभवानीच्या दरबारात नतमस्तक होतील. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याची मोठी घोषणा करण्याची शक्यता असून, तुळजाभवानीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा • तुळजापूर आणि पंढरपूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन • पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे सादरीकरण • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक • माजी आमदार प्रशांत परिचारक यांना सांत्वनपर भेट
मुख्यमंत्र्यांचा हा दौरा धार्मिक आणि विकासात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. त्याचबरोबर विकासाच्या नव्या योजना लवकरच अमलात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: मनसेचा उद्या गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे लक्ष