सावधान! मुंबईतील प्रसिद्ध बेकरी थिओब्रोमा आउटलेटमध्ये पनीर रोलवर रेंगाळले झुरळ; पहा व्हिडिओ
मुंबई: बाहेरील अन्नपदार्थ खाणं किती धोकादायक आहे, याचा प्रत्यय आता एका व्हायरल व्हिडिओवरून येत आहे. मुंबईतील प्रसिद्ध बेकरी ब्रँड थियोब्रोमाचे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, पण यावेळी कारण त्यांच्या ब्राउनीज किंवा कुकीज नसून स्वच्छतेबाबत गंभीर दुर्लक्ष आहे. रेडिटवरील एका वापरकर्त्याने मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील रनवाल ग्रीन्स आउटलेटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पनीर रोलच्या ट्रेजवळ एक झुरळ उघडपणे फिरताना दिसत आहे. वापरकर्त्याने असेही सांगितले की तो आणि त्याचा मित्र या आउटलेटवर ऑर्डर देणार होते, परंतु नंतर हे दृश्य त्यांच्या लक्षात आले. जेव्हा त्याने कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती दिली तेव्हा ट्रे काढून टाकण्यात आला.
हेही वाचा - माकडाचा विचित्र कारनामा! व्यावसायिकाकडून हिसकावली 20 लाख रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग
पनीर रोलवर रेंगाळले झुरळ -
सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. रेडिटवरील अनेक वापरकर्त्यांनी त्यांचे स्वतःचे वाईट रेस्टॉरंट आणि कॅफेचे अनुभव शेअर करण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने सांगितले की तो एका फाइन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये गेला होता, जिथे खुर्च्यांवर लाल मुंग्या होत्या. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की फ्रँचायझी मॉडेलमुळे ब्रँड गुणवत्ता नियंत्रित करू शकत नाहीत. ब्रँड फक्त दुकाने उघडतात, परंतु मालक आणि कर्मचारी जबाबदारीने काम करत आहेत की नाही याची खात्री करत नाहीत.
हेही वाचा - पाकिस्तानातील कराची तुरुंगातून 200 हून अधिक कैदी फरार; काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईतील प्रसिद्ध बेकरीत पनीर रोलवर झुरळे -
या घटनेनंतरही, थिओब्रोमाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. तथापि, या ब्रँडवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. दक्षिण दिल्लीतील एका वापरकर्त्याने लिहिले की त्याला ब्राउनीमध्ये प्लास्टिकचा तुकडा सापडला, जो त्याने चुकून खाल्ला कारण तो हॉट चॉकलेटने झाकलेला होता. या घटनांमुळे प्रसिद्ध ब्रँड देखील आता विश्वासार्ह राहिलेले नाहीत का? असा प्रश्न आता सर्वसामान्य ग्राहकांना पडू लागला आहे.