विध्यार्थी - पालक संघटना या थंडीच्या वातावरणाचा पर

'दिल्ली,पंजाबप्रमाणे शाळेच्या वेळेत बदल करा' थंडीमुळे शाळेच्या वेळा बदण्याची मागणी

संभाजीनगर: महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणेच, थंडीचा कडाका वाढत आहे. ही थंडी आनंददायक असली तरी,  शारीरिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. अशातच आता संभाजीनगरमध्ये सुद्धा नागरिकांना आपल्या मुलांच्या काळजी पोटी शिक्षण विभाकडे मागणी करावी लागतेय ज्या मागणीत विध्यार्थी - पालक संघटना या थंडीच्या वातावरणाचा परिणाम विद्यार्थ्यांवर न होण्यासाठी जिल्ह्यातील शाळेच्या वेळा बदलण्याची मागणी करतंय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शाळेच्या वेळेत बदल करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

 height=

विद्यार्थी-पालक संघटनांनी शिक्षण विभागाकडे या संदर्भात आपली मागणी ठेवली आहे. त्यात शाळेच्या वेळात बदल करून, थंडीमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. हा निर्णय पालक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो, कारण थंडीमुळे सकाळच्या वेळी शाळेत जाताना विद्यार्थ्यांना शारीरिक त्रास होऊ शकतो, तसेच त्यांच्या मनोबलावरही त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

'>http://

शिक्षण विभागाने यावर प्रतिक्रिया दिली आहे की, शाळांनी थंडीमुळे वेळेत बदल करण्यास इच्छुक असलेल्या शाळांनी शिक्षण विभागाला याबद्दल कळवावे. त्यानंतर, त्या शाळांना वेळेत बदल करण्याची मान्यता मिळवण्यासाठी विभाग त्यांना मदत करेल. तसेच, येत्या दोन दिवसांत या विद्यार्थ्यांच्या मागणीला मान्यता मिळेल की नाही, यावर शिक्षण विभागाचा निर्णय जाहीर होईल.

शाळेच्या वेळेत बदल होण्याची शक्यता विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक पाऊल ठरू शकते, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाईल.