चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी गेलेल्या भाविकाचा मृत्यू
संतोष कुलकर्णी. प्रतिनिधी. पंढरपूर: बेळगाव येथील शुभम पावले हा भाविक आपल्या मित्रांसोबत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आला होता. चंद्रभागा नदीपात्रात तो स्नानासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने भाविक वाहून गेला. तसेच, त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकांनी केलेल्या चार तासांच्या शोध मोहिमेनंतर शुभम नावाच्या भाविकाचा मृतदेह हाती लागला. दरम्यान, या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
संत तुकाराम महाराज पालखी 2025 चे वेळापत्रक:
18 जून - देहू ते आकुर्डी 19 जून - आकुर्डी ते नाना पेठ, पुणे 20 जून - पुण्यात विश्रांती 21 जून - पुणे ते लोणी काळभोर 22 जून - लोणी काळभोर ते यवत 23 जून - यवत ते वरवंड 24 जून - वरवंड ते उंडवडी गवळ्याची 25 जून - उंडवडी गवळ्याची ते बारामती 26 जून - बारामती ते सणसर 27 जून - सणसर ते निमगाव केतकी 28 जून - निमगाव केतकी ते इंदापूर 29 जून - इंदापूर ते सराटी 30 जून - सराटी ते अकलूज माने विद्यालय 1 जुलै - अकलूज माने विद्यालय ते बोरगाव 2 जुलै - बोरगाव ते पिराची कुरोली 3 जुलै - पिराची कुरोली ते वाखरी 4 जुलै - वाखरी ते पंढरपूर 5 जुलै - पंढरपूर 6 जुलै - आषाढी एकादशी पंढरपूर दर्शन 10 जुलै - परतीच्या प्रवासाची सुरुवात
हेही वाचा: 'या' कारणामुळे पुण्यातील प्रमुख 20 रस्ते आज वाहतुकीसाठी बंद
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मार्ग:
19 जून - आळंदीहून प्रस्थान 20 जून - आळंदी ते भवानीपेठ, पुणे 21 जून - पुण्यात विश्रांती 22 जून - पुणे ते सासवड 23 जून - सासवड येथे विश्रांती 24 जून - सासवड ते जेजुरी 25 जून - जेजुरी ते वाल्हे 26 जून - वाल्हे ते लोणंद 27 जून - लोणंद ते तरडगाव 28 जून - तरडगाव ते फलटण 29 जून - फलटण ते बरड 30 जून - बरड ते नातेपुते 1 जुलै - नातेपुते ते माळशिरस 2 जुलै - माळशिरस ते वेळापूर 3 जुलै - वेळापूर ते भंडिशेगाव 4 जुलै - भंडिशेगाव ते वाखरी 5 जुलै - वाखरी ते पंढरपूर 6 जुलै - आषाढी एकादशी पंढरपूर दर्शन 10 जुलै - गोपाळकाला आणि परतीच्या प्रवासाची सुरुवात