घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची फ्री-स्टाईल हाणामारी!
महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर शिवभक्तांच्या अलोट गर्दीने गजबजले असताना, दर्शन रांगेत गोंधळ उडाला. भाविकांमध्ये पुढे जाण्यासाठी धक्काबुक्की आणि फ्री-स्टाईल हाणामारी झाली.
याच दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आपल्या कुटुंबासह व्हीआयपी प्रवेशद्वारातून दर्शनासाठी जात असताना, सार्वजनिक रांगेत उभे असलेले अनेक भाविक बॅरिकेड्स ओलांडून त्यांच्या मागे घुसले. अचानक झालेल्या या गोंधळामुळे दानवे माघारी फिरले व काही वेळ बाहेर थांबले.
हेही वाचा : अंबादास दानवे यांनी घेतले महादेवाचे दर्शन, राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना
या घटनेमुळे मंदिर प्रशासन व पोलिसांच्या नियोजनातील त्रुटी उघड झाल्या. भाविकांची वाढती गर्दी, पोलिस आणि मंदिर विश्वस्तांतील समन्वयाचा अभाव यामुळे अव्यवस्था निर्माण झाली. यावर अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला तातडीने योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात लाखोंच्या संख्येने शिवभक्त दर्शनासाठी येतात, त्यामुळे नियोजन अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत दानवे यांनी व्यक्त केले.