बापाने मुलीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना

Dharashiv: दारुच्या नशेत बापाने दहा वर्षीय मुली.....

धाराशिव: बापाने मुलीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत बापाने दहा वर्षीय मुलीची हत्या केली आहे. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील ही घटना आहे. तसेच हत्येनंतर मृतदेहाच्या आजूबाजूला हळदीकुंकू टाकण्याचा संतापजनक प्रकारही बापाकडून करण्यात आला आहे.  

धाराशिव जिल्ह्यात वडिलांनीच स्वत:च्या मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या केलेल्या मुलीचे नाव गौरी जाधव असे असून ती इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होती. वडील ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन असल्याने गौरी तिच्या आजीकडे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वडील ज्ञानेश्वर करत आहे. कोणालाही सांगू नको अशी धमकी ज्ञानेश्वर जाधवने मुलीच्या आजीला दिल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा: बीड अत्याचार प्रकरणावरुन दमानियांचे संदीप क्षीरसागरांवर आरोप

बापाने मृतदेहाच्या आजूबाजूला टाकले हळदीकुंकू दारूच्या नशेत बापाने चौथीत शिकणाऱ्या मुलीची निर्घृण हत्या केली. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेळगाव येथे घडली धक्कादायक घटना घडली. अवघ्या दहा वर्षीय मुलीचा जीव घेताना बापाच्या काळजाला काही वाटले कसे नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुलीची हत्या करुनच हा बाबा थांबला नाही तर त्याने मुलीच्या मृतदेहाच्या आजूबाजूला हळदीकुंकू टाकले. 

एका बापाने आपल्या चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. सदर प्रकरणात आरोपी बापाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात आंबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हत्या केलेल्या मुलीचे गौरी जाधव होते. तर वडील ज्ञानेश्वर जाधव याने तिचा निघृण खून केला आहे. ज्ञानेश्वरला दारुचे व्यसन होते. यातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.  

मृतदेहाच्या बाजूला हळदीकुंकू का? टाकले नेमकी हत्या कशामुळे केली याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. वडील ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन असल्याने गौरी तिच्या आजीकडे राहत असल्याची माहिती समोर आली. हत्येनंतर कोणालाही सांगू नको अशी धमकी ज्ञानेश्वर जाधवने मुलीच्या आजीला दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुलीच्या आजीला मानसिक धक्का बसला आहे.