Dharashiv Murder Case: पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणाची आत्महत्या
धाराशिव: कर्जबाजारीपणातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलेले आहे. पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली आहे. धाराशिवमधील बावी गावातील खळबळजनक प्रकार आहे. लक्ष्मण मारुती जाधव असं तरुणाचं नाव आहे. तरुणाला ऑनलाईन सट्टा लावण्याचं व्यसन असल्याची माहिती मिळत आहे. तरुणाला ऑनलाईन सट्ट्यात पैसे हरल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे.
धाराशिवमधील बावी गावातील पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाला विष पाजून 29 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऑनलाइन रम्मीच्या खेळात पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नेमका प्रकार कशाने घडला याबाबतचे कारण समोर आलेले नसून पोलिस तपास सुरू आहे. लक्ष्मण मारुती जाधव, असे आत्महत्या करून कुटुंबाला संपवलेल्या तरुणाचे नाव आहे.
ऑनलाइन रम्मीच्या खेळात पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून तरुणाने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नेमका प्रकार कशाने घडला याबाबतचे कारण समोर आलेले नाही. दरम्यान पोलीस अधिकचा तपास करत आहेत. आत्महत्या करून कुटुंबाला संपवलेल्या तरुणाचे नाव लक्ष्मण मारुती जाधव, असे आहे. जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. त्याने तीन वर्षांपूर्वी गावातील तेजस्विनी यांच्याशी प्रेम विवाह केला होता. त्यांना दोन वर्षाचा मुलगा होता. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार लक्ष्मण जाधव याने कर्जबाजारीपणातून स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विकली होती. यानंतरही तो कर्जबाजारीपणातून मुक्त झाला नव्हता. त्यामुळे तो तणावात होता. दरम्यान, त्याने रविवारी रात्री पत्नी तेजस्विनी तसेच दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन मारून त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी माहिती मिळत आहे.