तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरताना दिसला. यामुळ

Dharashiv Viral Video : अबब! तुळजाभवानी मंदिरात देवीच्या मूर्तीवर फिरतोय उंदीर; मंदिर प्रशासनाचंही दुर्लक्ष?, भाविकांमध्ये नाराजी

धाराशिव: तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरताना दिसला. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती आहे. उंदरांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला असून मंदिर बंद केल्यावर थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार असल्याचं दिसून येतं आहे.  

धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला असून मंदिर बंद केल्यावर थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार असल्याचं दिसून आलं. तुळजाभवानी मातेच्या ऑनलाइन दर्शनादरम्यान उंदराचा मुक्त संचार दिसून आला. गुजरातमधील भावनगर येथील हितेश भाई जानी या भाविकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून उंदरांना तात्काळ  बंदोबस्त  करण्याची मागणी केली आहे. मंदिर बंद केल्यानंतर उंदीर तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात वावरत असल्याचं ऑनलाइन दर्शनातून स्पष्ट दिसून येत आहे. या उंदरांमुळे तुळजाभवानी मातेच्या प्राचीन अलंकाराचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Ganeshotsav 2025: गणेशमंडळांसाठी महत्त्वाची बातमी; गणेशोत्सवात डीजेच्या वापरावर बंदी, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर उंदीर तुळजाभवानी मंदिरात देवीच्या मूर्तीवर उंदीर फिरताना दिसला. या प्रकरणात धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक लक्ष घालणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंदिर प्रशासनाचंही दुर्लक्षामुळे असा प्रकार झाल्याचेही भाविकांचे म्हणणे आहे. मंदिरातील उंदरांच्या मुक्तसंचाराला आळा कधी बसणार आणि किती दिवसात उंदरांचा बंदोबस्त करणार? असेही सवाल उपस्थित होत आहेत. उंदीर ज्यावर फिरला तो प्रसाद भाविकांनी खाल्ल्यास काय होईल आणि उंदीर देवीच्या मूर्तीवर जाऊ नये म्हणून नेमका कसा बंदोबस्त करणार? असेही सवाल उपस्थित होत आहेत. 

तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार पाहायला मिळाला. ऑनलाइन दर्शनादरम्यान उंदीर दिसून आले. गुजरातमधील भावनगर येथील भाविकाला  उंदीर दिसला. हितेश भाई जानी असे या भाविकांचे नाव आहे. उंदरामुळे देवीच्या प्राचीन अलंकारांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.