धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार सुरेश धस

मुंडेंच्या राजीनाम्यावर धसांनी केले मोठे वक्तव्य; नेमकं काय म्हणाले धस?

बीड : बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सगळ्यांनीच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यात भाजपा आमदार सुरेश धस यांनी अगदी सुरूवातीपासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर आमदार सुरेश धस यांनी जय महाराष्ट्र मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 

आमदार सुरेश धस यांनी राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. देशमुख यांचे फोटो बघून मुंडे व्यथित झाले असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयीचा प्रश्न माध्यमांनी विचारला असता पंकजांवर बोलण्यापेक्षा देशमुख प्रकरण महत्वाचं आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो पाहून व्यथित झालो असल्याचे धस यांनी म्हटले आहे. बीडमध्ये देशमुखांच्या हत्येनंतर एक एक प्रकरणे उघड होत आहेत. बीडमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे बीडची कायदा सुव्यवस्था सुधारावी तसेच हिंदू नामावलीशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही असेही त्यांनी जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीला सांगितले आहे. 

हेही वाचा : Dhananjay Munde Statement: राजीनाम्यानंतर मुंडेंनी पोस्टमधून दिले कारण; काय म्हणाले?

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. हत्या करताना देशमुखांचे काढलेले फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असून सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. उज्वल निकम आरोपींना फासावर लटकवतील असा विश्वास आमदार धस यांनी व्यक्त केला आहे. 

आमदार सुरेश धस यांनी केलेली वक्तव्ये  'राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही' 'फोटो बघून मुंडे व्यथित झाले असं वाटत नाही' 'पंकजांवर बोलण्यापेक्षा देशमुख प्रकरण महत्वाचं' 'हत्येचे फोटो पाहून व्यथित झालो' 'बीडची कायदा सुव्यवस्था सुधारावी' 'हिंदू नामावलीशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही' 'देशमुख कुटुंबियांसोबत माझा संवाद सुरु आहे' 'उज्वल निकम आरोपींना फासावर लटकवतील'