Maharashtra Rain Update : मोठा निर्णय! अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर; 'या' जिल्ह्यांमध्ये शाळा राहणार बंद, जाणून घ्या
मुंबई: मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस आहे. यादरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहे. यासह, हवामान विभागाने पुढील काही दिवसात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्तया वर्तवली आहे. मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने मुंबईतील जनजीवन विस्खळीत झाले आहे. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. पावसाची सध्याची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनांनी शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, राज्यातील अनेक जिल्ह्यात शाळा बंद असणार आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 12 तासात मुंबईमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासह, मुंबईला रेड अलर्टही देण्यात आले आहे. मुंबईसह, उपनगरातही तुफान पाऊस होणार अशी माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षा कारणात्सव जिल्हा प्रशासनांनी शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
कोणत्या शाळा बंद असतील?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या मनपा हद्दीतील सर्व शाळा बंद असणार आहे. यासह, पावसामुळे कल्याण-डोंबिवलीतील शाळाही बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच, मंगळवारी पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मीरा भाईंदर पालिका हद्दीतही धुवाधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने मीरा भाईंदर भागात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे, मीरा भाईंदरचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी मीरा-भाईंदरमधील प्राथमिक, माध्यमिक शाळांना पत्रक सुट्टी जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
जिल्हा प्रशासनांनी शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यावर, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'हवामान खात्याने दिलेल्या माहितीचा विचार करून शाळांना सुट्टी जाहीर करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले होते. यानंतर, आता काही जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे'.