Buldhana: जाणून घ्या; टकल्या गावाची कहाणी
बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल आजाराची. या आजाराने अचानक लोकांच्या डोक्यावरचे मोठ्या प्रमाणात केस गळून टक्कल पडायला लागले. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एखादा टक्कल व्हायरस आला की काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर देशभरातून लोक बुलढाणा जिल्ह्याकडे संशयाने पाहू लागले होते. त्यामुळे कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराने हैरान झालेल्या लोकांना पुन्हा एकदा या टक्कल व्हायरसला सामोरे जावे लागते की काय अशा भीतीपोटी परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. स्थानिक आरोग्य यंत्रणांपासून राष्ट्रीय पातळीवरच्या आयसीएमआर सारख्या संस्थांचे मुंबई दिल्ली, चेन्नई, भोपाल येथून विविध संशोधकांची पथके टक्कल बाधित गावात दाखल झालीत. टक्कल आजाराने ग्रस्त रुग्णांचे रक्त, त्वचा, केस एवढेच काय तर गावातील पाणी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू सह गावची माती देखील नमुने म्हणून संशोधनासाठी घेण्यात आली.
आता लवकरच या राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था केस गळतीचे मुख्य कारण शोधून निदान करतील अशी अपेक्षा टक्कल आजाराने बाधित गावकरी करू लागले होते. मात्र दोन महिने उलटून गेले तरी राष्ट्रीय संस्थांना या टक्कल गळतीचे मुख्य कारण जाहीर करता आले नाही.मात्र तिकडे पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ संशोधक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी स्वखर्चाने या संपूर्ण प्रकरणात संशोधन केले आणि केस गळतीचे मूळ शोधून काढले आहे. नागरिकांनी खाल्लेल्या राशनच्या गव्हामध्ये सेनेलियम या घटकाचे प्रमाण हजार पटीने वाढल्याने ही केस गळती झाली असल्याचा दावा संशोधक हिम्मतराव बावस्कर यांनी केला आहे.
हेही वाचा: Bank of Maharashtra Loan Interest Rate: बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्याजदरांमध्ये कपात हिम्मतराव बावस्कर यांनी सांगितल्याप्रमाणे राशनच्या गव्हामुळे मोठ्या प्रमाणात सेनेलियम हा घटक लोकांच्या शरीरात गेला आणि लोकांना केस गळती होऊ लागली. एवढेच काय तर राशनच्या दुकानात आलेला गहू हा पंजाब आणि हरियाणा येथील असल्याचा देखील शोध डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी लावलाय. पंजाब आणि हरियाणा भागातील शिवालिक टेकड्या मधील दगडांमध्ये सेनेलियम नावाचा हा धातू मोठ्या प्रमाणावर आढळतो.आणि पावसाळ्यात या संपूर्ण दगडांमधून हा धातू तेथील शेत जमिनीमध्ये झिरपतो.आणि गव्हामध्ये मिसळतो. आणि हाच सेनेलियम युक्त गहू हरियाणा आणि पंजाबातून थेट बुलढाणा जिल्ह्यातील राशन दुकानांमध्ये आलाय.. आणि या गव्हाची कुठलीही तपासणी न करता सरकार हा विषारी गहू राशनच्या माध्यमातून लोकांना वितरित करत आहे.. त्यामुळे सेनेलियम युक्त हा विषारी गहू सरकारने तातडीने आपल्या ताब्यात घेऊन लोकांच्या जीवनाशी खेळणे थांबवले पाहिजे अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केली आहे..
टक्कल आजाराने केवळ केस गळती झाली अशातला भाग नाही, टक्कल आजारामुळे अनेक गावांमध्ये विपरीत सामाजिक परिणाम देखील पाहायला मिळालेत.. गावातील मुला मुलींच्या लग्नाच्या बोलण्या थांबल्या आहेत.. या गावातील मुलांना शाळेत देखील घेतलं जात नव्हतं.. एवढेच काय तर किराणा आणि व्यवहार देखील थांबविण्यात आले होते.. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनावर विपरीत परिणाम झाल्याचं बोललं जातंय.. त्यातून सावरन्यासाठी त्यांना मानसोपचाराची सुद्धा देखील गरज निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे..
आयसीएमआर ने केलेल्या संशोधनातून अद्याप काहीही जाहीर करण्यात आले नाही. आतापर्यंत तब्बल 291 रुग्ण या केस गळतीच्या आजाराने बाधित झाले आहेत. अजूनही काही गावांमध्ये या रुग्णांची संख्या धिम्या गतीने का होईना मात्र वाढत असल्याचं पाहायला मिळतंय.. आय सी एम आर च्या रिपोर्ट मध्ये नेमकं काय आहे.. किंवा ते रिपोर्ट केव्हा येतील यावर स्थानिक आरोग्य यंत्रणा बोलायला तयार नाही.. त्यामुळे सरकारकडून हे प्रकरण दाबलं जातंय का? हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय..
हेही वाचा: आम्हाला कोणतेही शिष्टमंडळ येऊन भेटलं नाही- देशमुख पंजाब हरियाणातून आलेल्या राशनच्या ज्या गव्हामुळे केस गळतीची सुरुवात झाली, तो गहू अद्याप सरकारने ताब्यात घेतलेला नाही. त्यामुळे शासनाने तातडीने या प्रकरणी पाऊले उचलून सेनेलियमयुक्त गहू राशनच्या माध्यमातून वितरित करणं थांबवणे कर्मप्राप्त आहे. आणि लोकांना सुरक्षित, चांगल्या दर्जाचा गहू वाटप केला पाहिजे अशी मागणी केस गळतीने बाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करताना पाहायला मिळत आहेत..
केंद्र सरकार पुरस्कृत योजनांमधून लोकांना राशन धान्य वाटप केलं जातं मात्र हे राशनचे धान्य सुरक्षित नसल्याचं डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांच्या संशोधनातून पुढे आल आहे.. दुसरीकडे आयसीएमआर च्या संशोधनात नेमकं काय आढळलं ती तथ्ये जाहीर करण्यात आली नाहीत.. त्यामुळे सरकार विषारी गहू वाटपास कारणीभूत ठरणाऱ्या राशन धान्य वितरक कंत्राटदार आणि राशन अन्नधान्य वितरण प्रणालीवर काम करणाऱ्या भारतीय धान्य महामंडळाचे काळे कारनामे लोकांचे जीव धोक्यात घालून लपवू पाहते की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय.