संभाजीनगरातील बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त करण्या

संभाजीनगरात बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त; 88 लाखांचा मुद्देमालासह 7 आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर: बनावट नोटांचा छापखाना उध्वस्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी वाळुज हद्दीतील ही घटना आहे. 88 लाखांचा मुद्देमालसह 7 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. 

संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या साजापूर क्रांतीनगर भागात कार्यरत असलेला बनावट नोटा छापणारा छुपा छापखाना अखेर पोलिसांच्या हाती लागला असून अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 59 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या बनावट 500 रुपयांच्या नोटा जप्त करत सात आरोपींना अटक केली आहे. छापखान्यातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कागद, शाई आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. याची एकूण किंमत सुमारे 2 कोटी 16 लाख रुपये आहे. 

हेही वाचा: यवत दंगल संवेदनशीलपणे हाताळा; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती

अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई वाळुज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या साजापूर क्रांतीनगर भागात असलेला बनावट नोटा छापणारा छुपा छापखाना अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 59 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या बनावट 500 रुपयांच्या नोटा जप्त केल्या. यात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण 88 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबीलवाडी भागात संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. छापखान्यात 500 रुपयांच्या बनावट नोटा वापरून सिगारेट खरेदी करत होते. त्यांच्याकडून 80 हजार रुपयांच्या बनावट नोटांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात शिवाजी गंगर्डे, सोमनाथ शिंदे, प्रदीप कापरे, मंगेश शिरसाठ, विनोद अर्बट, आकाश बनसोडे, अनिल पवार, अंबादास ससाणे हे आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस तपासात स्पष्ट झाले की, बनावट नोटांचे छपाई केंद्र एमआयडीसी वाळुज येथील साजापूर क्रांतिनगर परिसरात कार्यरत होते. छापखान्यातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कागद, शाई आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. याची एकूण किंमत सुमारे 2 कोटी 16 लाख रुपये आहे.