सध्या समाज माध्यमांमध्ये भाजपाच्या 81 जिल्हाध्यक्ष

भाजपाच्या 81 जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल; विक्रांत पाटलांनी केले आवाहन

मुंबई : सध्या समाज माध्यमांमध्ये भाजपाच्या 81 जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल होत आहे. या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन भाजपाचे आमदार विक्रांत पाटील यांनी केले आहे. 

सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष 2025” या नावाने फिरणारी 81 जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून त्या यादीचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. आतापर्यंत भाजपाच्या फक्त 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून अजून 22 जिल्हा अध्यक्ष घोषित होणे बाकी आहे.  त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असे आमदार विक्रांत पाटील यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन; तिरंगा रॅलीतून शौर्याला सलाम

भारतीय जनता पक्षाने 13 मे रोजी महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची यादी जाहीर केली आहे. या 58 जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षबांधणी सुरू केली आहे. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांची निवड करत भाकरी फिरवण्याचं काम केलं आहे. 

भाजपाकडून जाहीर केलेली अधिकृत जिल्हाध्यक्षांची यादी  कोकण  सिंधुदुर्ग - प्रभाकर सावंत रत्नागिरी उत्तर - सतिष मोरे रत्नागिरी दक्षिण - राजेश सावंत रायगड उत्तर - अविनाश कोळी  रायगड दक्षिण - धैर्यशील पाटील ठाणे शहर - संदिप लेले ठाणे ग्रामीण - जितेंद्र डाकी भिवंडी - रविकांत सावंत  मिरा भाईंदर - दिलीप जैन नवी मुंबई - डॉ. राजेश पाटील कल्याण - नंदु परब  उल्हासनगर - राजेश वधारिया

 

पश्चिम महाराष्ट्र  पुणे शहर - धिरज चाटे पुणे उत्तर(मावळ) - प्रदिप कंद पिंपरी चिंचवड - शत्रुघ्न काटे सोलापूर शहर - रोहिणी तडवळकर सोलापूर पूर्व - शशिकांत चव्हाण सोलापूर पश्चिम - चेतनसिंग केदार  सातारा - अतुल भोसले  कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) - राजवर्धन निंबाळकर  कोल्हापूर पश्चिम (करवीर) - नाथाजी पाटील सांगली शहर - प्रकाश ढंग सांगली ग्रामीण - सम्राट महाडिक

 

उत्तर महाराष्ट्र  नंदुरबार - निलेश माळी धुळे शहर - गजेंद्र अंपाळकर  धुळे ग्रामीण - बापु खलाने  मालेगांव - निलेश कचवे जळगांव शहर - दिपक सुर्यवंशी  जळगांव पूर्व - चंद्रकांत बाविस्कर  जळगांव पश्चिम - राध्येश्याम चौधरी अहिल्यानगर उत्तर - नितीन दिनकर अहिल्यानगर दक्षिण - दिलीप भालसिंग 

 

मराठवाडा  नांदेड महानगर - अमर राजूरकर परभणी महानगर - शिवाजी भरोसे  हिंगोली - गजानन घुगे  जालना महानगर - भास्करराव मुकुंदराव दानवे  जालना ग्रामीण - नारायण कुचे छत्रपती संभाजीनगर उत्तर - सुभाष शिरसाठ  छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय खंबायते धाराशिव - दत्ता कुलकर्णी 

 

विदर्भ  बुलढाणा - विजयराज शिंदे खामगांव - सचिन देशमुख अकोला महानगर - जयवंतराव मसणे अकोला ग्रामीण - संतोष शिवरकर  वाशिम - पुरुषोत्तम चितलांगे  अमरावती शहर - डॉ. नितीन धांडे  अमरावती ग्रामीण (मोरणी) - रविराज देशमुख यवतमाळ - प्रफुल्ल चव्हाण पुसद - डॉ. आरती फुफाटे मेळघाट - प्रभुदास भिलावेकर  नागपूर महानगर - दयाशंकर तिवारी  नागपूर ग्रामीण (रामटेक) - अनंतराव राऊत नागपूर ग्रामीण (काटोल) - मनोहर कुंभारे भंडारा - आशु गोंडाने गोंदिया - सिता रहांगडाले

 

मुंबई  उत्तर मुंबई - दिपक बाळा तावडे उत्तर पूर्व मुंबई - दिपक दळवी  उत्तर मध्य मुंबई - विरेंद्र म्हात्रे