बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची सुरुवात कुठून झाली? पुरावे 'जय महाराष्ट्र'च्या हाती
नागपूर: नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती नागपूर विभागासह संपूर्ण राज्यात असण्याची शक्यता. त्यामुळे राज्यातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचा तपासाची चौकशी प्रशासकीय, पोलिस विभागामार्फत सुरू आहे.
मात्र या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करून यात आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसह न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानभवनात मत मांडले. त्यामुळे राज्यस्तरीय एसआयटीची नेमणूक झाल्यास राज्यातील अनेक बडे अधिकारी या प्रकरणाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरिष्ठ लिपिक सुरज नाईक रजेवर असतांना त्यांच्या ID पासवर्डने 14 बोगस शालार्थ आयडी बनवण्यात आले, मात्र नाईक यांना समजताच त्यांनी या प्रकरणाची पहिली तक्रार तत्कालीन उपसंचालक उल्हास नरड यांच्याकडे केली. हेही वाचा:Maharashtra Liquor Policy: मद्यविक्री कंपन्यांना नवीन परवाने दिले जाणार नाहीत; अजित पवार यांची मोठी घोषणा
नागपूर मधील सायबर पोलीस ठाण्यात 9 मार्च ला ऑनलाईन तक्रार आणि 12 मार्च ला लेखी प्रत्यक्ष तक्रार शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग कार्यालयाचे उपसंचालक उल्हास नरड यांनी बोगस शालार्थ ID बनवण्यात येत असल्याची तक्रार केली.
दरम्यान शिक्षण विभागाच्या चौकशी नंतर नागपूर विभागाचे वेतन अधीक्षक निलेश वाघमारे हे याप्रकरणात सामील असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आणि त्याला शासनाने निलंबित केले.. त्यानंतर उल्हास नरड, उपसंचालक नागपूर शिक्षण विभाग आणि सुरज नाईक, वरिष्ठ लिपिक यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी अटक झाले मात्र दोन महिन्याहून अधिक कालावधी लोटून गेला असतांना देखील निलेश वाघमारे अद्याप फरार आहे. वाघमारे पोलिसांना अजून सापडला नाही.. त्यामुळे त्याला राजकीय वरदस्त आहे का यावरून पोलिसांच्या कार्याप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.