Pune-Solapur Road Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: वाहनाच्या समोरासमोर धडकेत दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी
Pune-Solapur Road Accident: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री यवत पोलीस ठाण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात लाल रंगाच्या स्विफ्ट कार व स्विफ्ट डिझायर या दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेमुळे घडला. प्राप्त माहितीनुसार, लाल रंगाची स्विफ्ट कार चालवणारा राकेश भोसले हा अतिवेगाने गाडी चालवत होता. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत होता. यावेळी त्याची गाडी उरुळीकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायरवर जोरात आदळली.
या भीषण धडकेत ज्ञानेश्वर थोरबोले (50, रा. उरुळी कांचन, पुणे) व गणेश दोरगे (28, रा. यवत, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर तासाभरापर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. प्राथमिक चौकशीत निष्काळजीपणे व वेगाने वाहन चालवल्याने अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - Sinhgad Fort Tragic accident : सिंहगडावर मोठी दुर्घटना? लघुशंकेला गेलेला पर्यटक परत आलाच नाही! शोध सुरू
दरम्यान, यापूर्वीच 29 जुलै रोजी बारामतीत एक हृदयद्रावक अपघात घडला होता. सकाळी महात्मा फुले चौकात भरधाव डंपर ट्रकने धडक दिल्याने 37 वर्षीय वडील व त्यांच्या दोन लहान मुलींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहरात शोककळा पसरला होती. पोलिसांनी या प्रकरणी निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवल्याच्या आरोपाखाली डंपर चालकाला अटक केली होती.
हेही वाचा - Rapido : रॅपिडोला 50 रुपयांचा दावा करणं पडलं महागात! भरावा लागणार 10 लाखांचा दंड; नेमकं झालं काय ?
या अपघातात मृत व्यक्ती ओंकार आचार्य हे त्यांच्या मुली सई (10) आणि मधुरा (4) यांच्यासोबत मोटारसायकलवरून घरी परतत होते. महात्मा फुले चौकात वळत असताना डंपर चालक दशरथ दत्तात्रय डोळे (50) यांनी अतिवेगाने ट्रक चालवत मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ट्रकचे मागचे चाक मोटारसायकलला धडकले आणि तिघेही गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. पुणे जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि वाहन चालवताना निष्काळजीपणा ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत.