Adulteration Crackdown In Mumbai: मुंबईत FDA ची मोठी कारवाई! 218 किलो बनावट चीज आणि 478 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट
Adulteration Crackdown In Mumbai: मुंबईत सणासुदीचा हंगाम सुरू होताच, अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) भेसळीविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. 11 ऑगस्टपासून एफडीए अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 42 अन्न प्रतिष्ठानांची तपासणी केली आहे. तसेच प्रयोगशाळेतील चाचणीसाठी 55 नमुने घेतले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त चीज आणि दूध नष्ट करण्यात आले आहे.
अँटॉप हिलमध्ये 218 किलो बनावट चीज जप्त
प्राप्त माहितीनुसार, अँटॉप हिल परिसरात पोलिसांच्या मदतीने छापा टाकताना एफडीए पथकाने लेबल नसलेले चीज अॅनालॉग पकडले. तपासणीनंतर 218 किलो बनावट चीज घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. या चीजची किंमत सुमारे 54,625 रुपये होती.
हेही वाचा -
दहिसरमध्ये 478 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट
दहिसरमध्ये एका व्यक्तीला दुधात भेसळ करताना रंगेहात पकडण्यात आले होते. येथे विविध ब्रँडचे दूध मिसळून बनावट दूध तयार केले जात होते. या ठिकाणी 478 लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. दरम्यान, एफडीएचे सहआयुक्त मंगेश माने यांनी ग्राहकांना सणासुदीच्या खरेदीदरम्यान सावध राहण्याचे आवाहन केले. त्यांनी नागरिकांना उत्पादनाचे लेबल, उत्पादन तारीख, कालबाह्यता, बॅच क्रमांक आणि परवाना तपासण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा - Manoj Jarange Aandolan : आंतरवाली सराटी ते आझाद मैदान व्हाया जुन्नर; या मार्गांवरून जातोय जरांगेंचा मोर्चा
रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खरेदी करणे टाळा
तथापी, फेरीवाले किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांकडून मिठाई किंवा इतर खाद्यपदार्थ खरेदी करू नका, असा इशाराही एफडीएने दिला आहे. पॅक केलेले पदार्थ घेताना, अनुक्रमांक, ट्रेडमार्क आणि पॅकेजिंग माहिती देखील तपासण्याचे आवाहन देखील एफडीएने केले आहे.
हेही वाचा - Eknath Shinde Meet Raj Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले राज ठाकरेंच्या गणरायाचे दर्शन
तक्रार कुठे करावी?
ग्राहकांना जर भेसळ असल्याचा संशय आला, तर ते अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या टोल-फ्री हेल्पलाइन 1800 222 365 वर तक्रार दाखल करू शकतात.