महाराष्ट्र

अकोल्यातील जलाशयांवर परदेशी पक्ष्यांचे आगमन

अकोला: पक्षी निरीक्षण हा अनेक लोकांचा आवडता छंद आहे. निसर्गाच्या सान्निध्यात पक्ष्यांचे सौंदर्य आणि त्यांच्या अनोख्या प्रवृत्तींचा अभ्यास करण्याची संधी पक्षीप्रेमींना खूप आनंद देणारी असते. दरवर्षी भारतात स्थलांतर करणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने पक्षीप्रेमींना मोठी पर्वणी मिळते. यंदा देखील अकोला जिल्ह्यातील विविध जलाशयांवर उत्तरेकडील अति थंड प्रदेशांतून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे.

दरवर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला उत्तर ध्रुवीय देशांमधील बर्फवृष्टीमुळे तापमान अत्यंत कमी होतो. अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे पक्षी भारतात स्थलांतर करतात. भारतात येताना हे पक्षी विविध राज्यांमध्ये थांबतात आणि थोडा काळ मुक्काम करतात. अकोला जिल्ह्यातील कापशी तलाव, कुंभारी तलाव, आखतवाडा तलाव, काटेपूर्णा जलाशय, आणि पोपटखेड तलाव हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे थांबे ठरतात.सकाळी आणि सायंकाळी जलाशयांच्या परिसरात आकाशात उडणारे पक्ष्यांचे थवे पक्षीप्रेमींसाठी नेत्रसुखद ठरले आहेत. काही पक्षी २-३ महिने येथे मुक्काम करतात, तर काही फक्त १-२ दिवस राहून पुढील प्रवासाला निघून जातात.

 height=

आगमन झालेल्या पक्ष्यांच्या प्रजाती अकोला जिल्ह्यात यंदा खालील स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे:     •    चक्रयाक     •    तुतवार     •    कॉटन पिग्मी     •    नॉर्दन शींचलर     •    रेड फिस्टर्ड पोचाई     •    ब्राह्मणी धार     •    पद्रकदंब     •    ग्रे गेनी     •    चक्रांक बदक     •    मुनिया     •    गडवाल     •    शंकर     •    कॉमन पोचाई     •    छोटा आलर्जी

स्थानिक पक्षीप्रेमी देवेंद्र तेलकर यांनी अकोल्यातील जलाशयांवर पक्ष्यांच्या विविध प्रजातींचे फोटो आणि व्हिडिओ टिपले आहेत. त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेली ही दृश्ये पक्षीप्रेमींसाठी प्रेरणादायक ठरली आहेत.

 

 

त्याचबरोबर,पक्ष्यांचे स्थलांतर हा निसर्गचक्राचा महत्त्वाचा भाग आहे. जलाशय, पाणथळ जागा, आणि पर्यावरणीय परिस्थिती टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. जलप्रदूषण, शिकारी आणि जंगलतोड यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो.