Ganpati Festival 2025 : चाकरमान्यांच्या वाटेत अडथळे ; कोकणचा प्रवास धीम्या गतीने, रेल्वेच्या वेळाही गडबडल्या
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या धामधूम दिसून येत आहे. मुंबईतून तसेच इतर काही ठीकाणाहून कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते आहे. सध्या विविध रेल्वे आणि बस स्थानकांवर लांबच्या लांब रांगादेखील बघायला मिळत आहे.
कोकणात जाण्यासाठी अनेक जण लालपरी म्हणजे बसने जाण्याचा पर्यायाचा अवलंब करत आहेत. कुर्ला नेहरूनगर एसटी आगारात कोकणातील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटेत अडथळे आले आहेत.
हेही वाचा - Bhandara Guardian Minister: पंकज भोयर यांची भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी; काय म्हणाले भोयर?
कोकणात जाणारी मांडवी एक्सप्रेस सध्या उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना अक्षरश: मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे कुर्ला टर्मिनसवरून सावंतवाडीसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दरम्याने कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरदेखील गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कोकणात जाण्यासाठी साधारण ७-८ तासांचा कालावधी लागतो. मात्र आता वाहतूक कोंडी झाल्याने कोकणात पोहोचण्यासाठी १६ ते १८ तासांचा कालावधी लागत आहे .