कोकण मार्गावर धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसला आत
Netravati Express Stop : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी ! नेत्रावती एक्सप्रेस 'या' स्ठानकातही थांबणार
गणपती सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाकरमान्यांची पावले कोकणाकडे वळत आहेत. अशातच आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसला आता एक नवीन थांबा लवकरच मिळणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नेत्रावती एक्स्प्रेसला आता राजापूर स्थानकात थांबा मंजूर करण्यात आला आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
दरम्याने गेल्या काही काळापासून नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर येथे थांबा मिळावा यासाठी विविध प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती. अखेर या प्रयत्नांना यश मिळालं आहे. त्यामुळे एलटीटी-तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्स्प्रेस आता राजापूर स्थानकात थांबणार आहे.