गित्ते आणि तांदळेने आव्हाडांची रेकी केली; बाळा बांगरचे गोट्या गित्तेवर खळबळजनक आरोप
मुंबई: महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्तेने सुरेश धस, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी दिली. गित्ते आणि तांदळेने आव्हाडांची रेकी केली. गोट्या गित्ते सायको किलर आहे असा खळबळजनक आरोप बाळा बांगर यांनी केला आहे.
गोट्या गीते आणि तांदळे नामक युवकाने मला आमदार सुरेश धस व आमदार आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मागच्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये या दोघांनी मुंबईमध्ये जाऊन आमदार आव्हाड यांची रेकी केली होती असा खळबळजनक आरोप वाल्मिक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी केला आहे. गोट्या गीते याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाळा बांगर यांनी प्रतिक्रिया दिली असून यामध्ये त्यांनी गोट्या गीते हा सायको किलर आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीची हत्या झाल्यावर त्याला अटक करणार आहात का? असा सवाल पोलीस प्रशासनाला केला असल्याचे बाळा बांगर यांनी म्हटले आहे.
बीडच्या परळीतील सराईत गुन्हेगार आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्तेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आमदार सुरेश धस, खासदार सोनवणे, अंजली दमानिया आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. तसेच वाल्मिक कराडचा मी एक कार्यकर्ता आहे, ते माझ्यासाठी दैवत आहेत असं म्हणतोय. तसेच धनंजय मुंडे साहेबांना कोणीही टार्गेट करू नका असा इशारा देखील तो व्हिडिओतून देत आहे. दरम्यान त्याने व्हिडिओ शूट करून व्हायरल केला आहे. मात्र पोलिसांच्या पथकांना गोट्या गित्ते कधी सापडणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे हे अद्याप पर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच व्हिडिओवर आता बाळा बांगर या भाष्य केलं आहे. गित्ते आणि तांदळेने आव्हाडांची रेकी केली. गोट्या गित्ते सायको किलर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.