Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा भव्य सोहळा!
भिवंडी: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा गावात उभारण्यात आले आहे. तब्बल एक ते दीड एकर जागेत विस्तारलेले हे मंदिर 56 फूट उंच असून, महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला समर्पित आहे.
या भव्य मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या प्रसंगी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधीक्षक यांसारखे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या भव्य मंदिरामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा नवीन पिढीपर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला नवसंजीवनी मिळेल. त्याचबरोबर या कार्यक्रमाला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.