Acharya Devvrat: गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत सांभाळणार महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार; राष्ट्रपतींनी दिली मान्यता
Acharya Devvrat: सीपी राधाकृष्णन यांची 9 सप्टेंबर रोजी भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. राधाकृष्णन यांनी माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर 452-300 मतांनी विजय मिळवला. सीपी राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार होते. त्यांनी दुसऱ्या सर्वोच्च संसदीय पदासाठी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली.
सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपदी पदी निवड झाल्यानंतर, महाराष्ट्रातील राज्यपालपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना त्यांच्या स्वतःच्या जबाबदाऱ्यांसह महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपालपद सांभाळण्याचे काम देण्यात आले आहे. आचार्य देवव्रत यांनी गुजरातचे राज्यपालपद जुलै 2019 पासून स्वीकारले आहे. त्यापूर्वी त्यांनी ऑगस्ट 2015 ते जुलै 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.
हेही वाचा - Eknath Khadse : मराठ्यांमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर...; खडसेंचं मोठं वक्तव्य
आचार्य देवव्रत कोण आहेत?
देवव्रत यांचा शैक्षणिक अनुभवही विशेष आहे. त्यांच्याकडे इतिहास आणि हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी, शिक्षणात पदवी, योग विज्ञानात पदविका आहेत. त्यांनी निसर्गोपचार आणि योगिक विज्ञानामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. त्यांनी वैदिक मानव मूल्ये आणि तत्वज्ञानावर व्याख्याने दिली आहेत आणि यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. तसेच, नैसर्गिक शेती आणि गोवंश सुधारणा याबाबत जागरूकता पसरविण्यासाठीही त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे.