Sadawarte Vs Manoj Jarange : मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंना धमकीचा फोन; सदावर्तेंचा पलटवार
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहे. यासह, त्यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. यासह, मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानात उपस्थित आहेत.
यादरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनीही मनोज जरांगेंना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. अशातच, मराठा आंदोलकांकडून धमकीचा फोन आल्याची माहिती ॲड. गुणरत्न सदावर्तेंनी दिली. 'संदीप क्षीरसागर सम्माननीय आमदार आहेत. त्याचबरोबर, प्रकाश सोळंके, शरद पवार गटाचे पुढारी तिथे मिरवताना दिसतात. मग मिरवुकीत कोणी किती गाड्या दिल्या? किती मदत केली? लोक कसे जमले?', असा सवाल ॲड. गुणरत्न सदावर्तेंनी केला. पुढे, ॲड. सदावर्ते म्हणाले की, 'शरद पवार यांच्या या वयातील राजकारणामध्ये ताकद आहे की नाही, ये भी हम देखना चाहते है भाई.
'अरे तुममे कितना दम है?' - ॲड. सदावर्ते
वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, 'अरे तुममे कितना दम है? क्या तुम पब्लिक को सच बोलोगे? या फिर पर्देके पिछेसे गेम खेलते रहोगे?', अशी टीका ॲड. सदावर्तेंनी शरद पवारांवर केली.
पुढे, ॲड. सदावर्ते म्हणाले की, 'जरांगेंना मुंबईत आमरण उपोषण करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी आम्ही माननीय उच्च न्यायालयात केली होती. यासोबतच, एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती'.
'ज्याप्रमाणे शेतात बुजगावणं उभं केलं जातं, तसंच एक बुजगावणं उभं केलंय. कोणत्याही पक्षाने शेतातील धान्य खाऊ नये म्हणून बुजगावणं नाचत आहे. परंतु आगामी गल्लीच्या राजकारणाच्या निवडणुकीसाठी जरांगे नावाचा विचार उभा केला आहे', अशी टीका ॲड. सदावर्तेंनी केली.
'या' आमदारांनी आणि खासदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
बीडचे खासदार बजरंग सोनवणे, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील, बीड विधानसभा मदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर, बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित, शरद पवार गटाचे माढ्यातील आमदार अभिजीत पाटील, आदी. आज आझाद मैदानात उपस्थित होते. यादरम्यान, त्यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिला.