राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस अ

Rohit Pawar: 'पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे?', अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणी रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

Rohit Pawar Post On Ajit Pawar and IPS Anjana Krishna Controversy: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात फोनवर झालेले संभाषण प्रचंड व्हायरल झाले. यानंतर अजित पवारांवर विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र डागण्यात आलं. अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कर्तव्यापासून रोखण्याचे काम अजित पवारांनी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. यानंतर या प्रकरणावर अजित पवरांनी स्पष्टीकरण सुद्धा दिले. यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे. 

काय म्हणाले रोहित पवार?  आमदार रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत अजित पवारांची बाजू घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की. मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा: Raj Thackeray & Uddhav Thackeray : मोठी अपडेट! दसरा मेळाव्यात होणार ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा? जाणून घ्या

पुढे बोलताना, राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात "चहापेक्षा किटली गरम असणारे" एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल असेही रोहित पवार यांनी सांगितले.