नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाची दयनीय अवस्था

नांदेडमधील शासकीय रुग्णालयात हलगर्जीपणा; रुग्णांच्या अंगावर फिरतात उंदीर

प्रवीण खंडारे. प्रतिनिधी. नांदेड: नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उंदराने एका रुग्णाचा पाय कुरतडल्याचा प्रकार समोर आला होता. या गंभीर प्रकारानंतर आता आणखी एक भयानक प्रकार समोर आला आहे. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णावर चक्क उंदीर खेळताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: तुम्ही अजूनही पुण्याचे नाही, कोल्हापूरचेच वाटता, दादांचा दादांना मिश्किल टोला

नेमकं प्रकरण काय?

नांदेड जिल्ह्यात असलेल्या कंधार गावातील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णावर चक्क उंदीर खेळताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत महिला रुग्ण झोपलेली असताना तिच्या अंगावर उंदीर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे. या दरम्यान, रुग्णालयात सर्वत्र उंदरांचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आले असून, त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे, रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.