State Cabinet Meeting Decisions : आता 9 तासांऐवजी 12 तासांची शिफ्ट; जादा तास काम केल्याने मिळणार दुप्पट पैसे, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कारखान्यातील कामगारांचे दैनंदिन कामाचे तास 9 वरून 12 करण्यात आले आहेत. यासह, दुकाने आणि संस्थानांमधील कामांच्या तासांची मर्यादा 9 वरून 10 करण्यात आले आहेत.
मात्र, आठवड्याला कामाची एकूण मर्यादा 48 तासांवरच राहील. ही मर्यादा कायम राहणार आहे. याचा अर्थ कामगारांकडून 8 तास काम करून घेता येईल. पूर्वी दररोज कामाच्या तासांची मर्यादा 9 तास होती. त्यामुळे, 8 तासांपेक्षा जास्त वेळ काम केले, तर कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावे लागतील. यासह, जर आठवड्यात 56 तास काम करून घेतले, तर एक दिवसाची रजा द्यावी लागेल. तसेच, जर कामगारांकडून जास्त वेळ करून घ्यायचे असेल, तर त्यासाठी काही दिवस आधीच संबंधित सरकारी विभागांकडून परवानगी घ्यावी लागेल. हा नियम 20 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या संस्थानांना लागू राहणार आहे.
राज्यातील उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व्हावी आणि जास्त तास काम करून कामगारांना अधिक पैसे मिळावेत यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कारखान्यांमध्ये कामाचे तास आता 9 ऐवजी 12 तास असतील.
दुकाने आणि संस्थानांमध्ये 9 ऐवजी 10 तास काम करता येईल.
हा नियम फक्त 20 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांना लागू राहील.
या निर्णयामुळे राज्यात नवीन रोजगाराच्या संधी वाढतील आणि उद्योगांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने अधिनियम 1948 आणि महाराष्ट्र दुकाने संस्थान अधिनियम यामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.