मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सिंगने विमानाच्या शौचालय

दिल्ली-शिर्डी विमानात मद्यधुंद प्रवाशाकडून इंडिगो एअर होस्टेसचा विनयभंग; आरोपीला अटक

Indigo Air प्रतिकात्मक प्रतिमा

शिर्डी: दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या इंडिगोच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाकडून एअर होस्टेसचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजस्थानमधील संदीप सुमेर सिंग या सरकारी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. 

प्राप्त माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सिंगने विमानाच्या शौचालयाजवळ एअर होस्टेसला अनुचित प्रकारे स्पर्श केला. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या क्रू मेंबरने तातडीने मॅनेजरला माहिती दिली, ज्यांनी लँडिंगच्या वेळी विमानतळ सुरक्षेला सूचना दिली.

हेही वाचा - वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग? छाया कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल

दरम्यान, विमान शिर्डी विमानतळावर पोहोचल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. राहाता पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीत आरोपीने दारू पिल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा - Gokul Milk Price Hike: अमूलनंतर आता गोकुळचे दूधही महागले; काय आहेत नवीन दर?

राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील आणि सरकारी विभागात नोकरी करणाऱ्या सिंगला राहाता पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. इंडिगोने अद्याप या प्रकरणावर अधिकृत निवेदन दिलेले नाही.